HSC Exam ! शालेय शिक्षणमंत्री म्हणतात, तो पेपर फुटलाच नाही

बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याची घटना शनिवारी घडली. मात्र, शालेय  शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत  सांगितलं की..

Updated: Mar 14, 2022, 11:59 AM IST
HSC Exam ! शालेय शिक्षणमंत्री म्हणतात, तो पेपर फुटलाच नाही title=

मुंबई : विलेपार्ले येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर रसायनशास्त्रचा (केमिस्ट्री) पेपर फुटल्याची घटना घडली. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय. याबाबत गुन्हा दाखल झाला असून चौकशी सुरु आहे, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिली.

विद्यार्थ्यांना १० मिनिटे आधी प्रश्नपत्रिका वाटली जाते. त्यानुसार रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका १०.२० वाजता वितरित करण्यात आली. मात्र, एका विद्यार्थिनीला येण्यास उशीर झाला होता. तिचा फोन चेक केला असता प्रश्नपत्रिकेचा काही भाग मोबाईलमध्ये १०.२४ वाजता आढळून आला.

बारावी रसायनशास्त्रचा हा संपूर्ण पेपर फुटला नाही. त्यातील काही भाग त्या विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये आढळून आला. त्या विद्यार्थिनीच्या चॅटनुसार  या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. हा मुद्दा विधान परिषदेत विरोधी पक्षाकडून विचारण्यात आला होता.