मुंबई : राज्य सरकारला ( Maharashtra government) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court ) मुंबईत लोकल सेवा (Mumbai Local) सुरु करण्याबाबत विचारणा केली आहे. अजून किती दिवस लोकल बंद राहणार, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. त्याचवेळी कोरोनासोबत जगावं लागणार आहे, असे सांगत न्यायालयाने म्हटले आहे, ६ महिने झाले, अजून किती दिवस लोकल बंद राहणार, अशी विचारणा केली आहे. दरम्यान, लोकल सुरू करण्याबाबत मागणी होत आहे.
अजून किती दिवस लोकल बंद राहणार?'
मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल । कोरोनासोबत जगावे लागणार - उच्च न्यायालय । ६ महिने झाले, अजून किती दिवस बंद?'
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला प्रश्न । लोकल सुरू करण्याबाबत न्यायालयाची विचारणा #Mumbai #mumbailocal @ashish_jadhao pic.twitter.com/wRUEaZ4zaW— ZEE २४ तास (@zee24taasnews) September 10, 2020
मुंबईतील लोकल सेवा किती काळासाठी बंद असणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी कोविड-१९ या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर येथील उपनगरीय रेल्वे सेवा प्रतिबंधित करण्याच्या किती काळासाठी योजना आहे याबद्दल महाराष्ट्र सरकारला विचारले. वकिलांना मुंबई शहरातील लोकल गाड्या सुरु करण्याची मागणी केली आहे. लोकल सेवेला परवानगी मिळावी या मागणीसाठी न्यायालय याचिका केली आहे. या संबंधित याचिकेवर सुनावणी सुरु झाली आहे. त्यावेळी उच्च न्यायालयाने ही विचारणा केली आहे.