मुंबई: ३१ डिसेंबरची तारीख जवळ आल्यामुळे आता सर्वांनाच नववर्षाचे वेध लागले आहेत. अनेकजणांनी आतापासूनच नव्या वर्षाचे संकल्प मनात आखून ठेवलेत. तसेच पुढच्यावर्षी फिरायला कुठे जायचे, याचे प्लॅन्सही अनेकांनी आखले असतील. मात्र, २०१९ ची दिनदर्शिका पाहता पुढच्या वर्षात सुट्ट्यांसाठी नोकरदारांची कसोटी लागणार आहे. २०१८ मध्ये शनिवार, रविवारला जोडून सलग अशा १६ सुट्ट्या आल्यामुळे अनेकांची चंगळ झाली होती. परंतु, पुढील वर्षी अशा सलग सुट्ट्यांची संख्या बरीच कमी आहे. यंदा विकेंडला जोडून फक्त १० सुट्ट्या येणार आहेत. त्यामुळे मोठ्या सुट्टीचे प्लॅन करणाऱ्यांना काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. मात्र, अनेक सरकारी सुट्ट्या शनिवारी व रविवार सोडून इतर दिवशी आल्यामुळे त्या वायाही जाणार नाहीत. याशिवाय, २०१९ मधील सर्वाधिक सुट्ट्या या ऑगस्ट आणि एप्रिल महिन्यात असतील.
जानेवारी
१३ जानेवारी- लोहारी (ऐच्छिक सुट्टी)
१४ जानेवारी- मकरसंक्रांती (ऐच्छिक सुट्टी)
१५ जानेवारी- पोंगल (ऐच्छिक सुट्टी)
२६ जानेवारी- प्रजासत्ताक दिन
फेब्रुवारी
१० फेब्रुवारी- वसंत पंचमी (ऐच्छिक सुट्टी)
१९ फेब्रुवारी- शिवजयंती
मार्च
४ मार्च- महाशिवरात्री
२१ मार्च- धूलीवंदन
एप्रिल
१३ एप्रिल- रामनवमी
१४ एप्रिल- आंबेडकर जयंती
१७ एप्रिल- महावीर जयंती
१९ एप्रिल- गुड फ्रायडे
मे
१८ मे- बुद्धपौर्णिमा
३१ मे- जमात-उल-विदा (ऐच्छिक सुट्टी)
जून
५ जून- रमजान ईद
जुलै
४ जुलै- रथयात्रा (ऐच्छिक सुट्टी)
ऑगस्ट
१२ ऑगस्ट- बकरी ईद
१५ ऑगस्ट- स्वातंत्र्य दिन\ रक्षाबंधन
२४ ऑगस्ट- गोकुळाष्टमी
पारसी न्यू इयर (पतेती) - शनिवार, १७ ऑगस्ट
सप्टेंबर
श्रीगणेश चतुर्थी - सोमवार, २ सप्टेंबर
मोहरम - मंगळवार, १० सप्टेंबर
ऑक्टोबर
महात्मा गांधी जयंती - बुधवार, २ ऑक्टोबर
दसरा - मंगळवार, ८ ऑक्टोबर
दिवाळी लक्ष्मीपूजन - रविवार, २७ ऑक्टोबर
दिवाळी बलिप्रतिपदा - सोमवार, २८ ऑक्टोबर
नोव्हेंबर
ईद-ए-मिलाद - रविवार, १० नोव्हेंबर
गुरू नानक जयंती - मंगळवार, १२ नोव्हेंबर
डिसेंबर
नाताळ - बुधवार, २५ डिसेंबर