ऐतिहासिक कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी लाभदायी - महसूलमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली ऐतिहासिक कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार असल्याचा दावा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Updated: Jun 24, 2017, 11:40 PM IST
ऐतिहासिक कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी लाभदायी - महसूलमंत्री title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली ऐतिहासिक कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार असल्याचा दावा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

या कर्जमाफीचा तळागाळातल्या शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी झी २४ तासशी बोलताना व्यक्त केला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी देशातली आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफीची घोषणा केली आहे. तब्बल ३४ हजार कोटींची कर्जमाफी राज्य सरकारनं जाहीर केली आहे. 

राज्यातल्या समुारे ९० टक्के शेतक-यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर ४० लाख शेतक-यांचा सातबारा या कर्जमाफीमुळे कोरा होणार आहे. दीड लाखापर्यंतचं कर्ज सरकारनं सरसकट माफ केलं आहे. 

याखेरीज नियमित कर्ज भरणा-यांना २५ टक्के किंवा कमाल २५ हजार रुपये इतकं अनुदान दिलं जाणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि उच्चस्तरीय मंत्रीगटाचे सदस्य दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचं स्वागत केलंय.