पेईंग गेस्ट तरुणींच्या खोलीत घर मालकाने लावला छुपा कॅमेरा

मुंबईतला धक्कादायक प्रकार आला समोर

Updated: Dec 25, 2018, 02:25 PM IST
पेईंग गेस्ट तरुणींच्या खोलीत घर मालकाने लावला छुपा कॅमेरा title=

मुंबई : घरात पेईंग गेस्ट म्हणून राहात असलेल्या मुलींचं चोरून चित्रीकरण करणाऱ्या घरमालकाला पोलिसांनी अटक केली आहे. दक्षिण मुंबईतून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दक्षिण मुंबईतल्या आपल्या चार बेडरूमच्या फ्लॅटमध्ये या घरमालकाने तीन मुलींना पेईंग गेस्ट म्हणून जागा घर भाड्याने दिलं आहे. या मुलींचं संभाषण ऐकणं आणि चित्रीकरण करण्यासाठी या घरमालकाने मुलींच्या खोलीत छुपा कॅमेरा लावला होता.

कॅमेरा आणि अॅडप्टर या मुलींनी घरातून शोधून काढला. पोलिसांना या बाबत सगळी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी कॅमेरे आणि इतर वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याआधी या घरमालकाने किती मुलींचं चित्रीकरण केलं आहे याचीही पोलीस चौकशी करत आहेत.