Hema Malini : ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्यावर मुंबई मेट्रोने प्रवास करण्याची का आली वेळ?

Hema Malini Mumbai Metro : ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांना मुंबईतील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तासनतास कारमध्ये बसून राहणे त्यांना कठिण होऊ लागले. कारमध्येच सोडून त्यांनी मेट्रोने जाणे पसंत केले. त्यांना कारने जुहू ते दहिसर दरम्यानचा प्रवास करण्यासाठी दोन तास लागले.  

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 12, 2023, 12:02 PM IST
Hema Malini : ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्यावर मुंबई मेट्रोने प्रवास करण्याची का आली वेळ? title=
Pic courtesy - twitter @Hema Malini

Hema Malini traveled by Mumbai Metro : मुंबईतील रस्त्यांवरुन प्रवास करताना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हे सर्वसामान्यांसाठी नवीन नाही. मात्र, ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांना मुंबईतील वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसला. त्यांना कारने जुहू ते दहिसर दरम्यानचा प्रवास करण्यासाठी दोन तास लागले. रस्ता वाहतूक कोंडी आणि होणारा वेळ पाहता त्यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देत आपणही मुंबईकर असल्याचे दाखवून दिले. त्यांनी आधी मुंबई मेट्रोन प्रवास केला. त्यानंतर रिक्षा पकडून त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. या प्रवासाचे फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.

मुंबईत मेट्रोचे काम सुरु आहे. त्यात वाहतूक कोंडी होत आहे. याचा फटका अभिनेत्री आणि भाजप नेत्या हेमा मालिनी यांना बसला. जुहू ते दहिसर दरम्यानचा कारने प्रवास करताना त्यांना मोठी कसरत करावी लागली. वाहतूक कोंडीमुळे गाडी पुढे सरकण्यास लागणारा वेळ पाहता, त्यांनी आपली आलिशान कार सोडून मुंबई मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. हेमा मालिनी मुंबई मेट्रोमध्ये दिसल्यानंतर अनेकांना विश्वास बसेना. चक्क हेमा मालिनी मेट्रोमध्ये पाहताच अनेकांना आश्चर्य वाटले. त्यांची साधी राहणी सर्वांनाच भावली. यावेळी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी महिला वर्गाची झुंबड उडाली. यावेळी हेमा मालिनी यांनी कोणालाही नाराज केले नाही. त्यांना मेट्रोमध्ये सेल्फी घेण्यास दिले. त्यानंतर त्यांचा मेट्रोचा प्रवास संपल्यानंतर त्यांनी रिक्षाने आपले घर गाठले.

हेमा मालिनी यांनी या प्रवासाबाबत फोटो शेअर करताना काही अनुभवही शेअर केला आहे. माझा अनोखा, अद्भुत अनुभव मी तुम्हा सर्वांसोबत शेअर केलाय. कारने दहिसरला पोहोचण्यासाठी दोन तास  लागले, खूपच दमछाक झाली. त्यामुळे मी मुंबई मेट्रोचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला. मेट्रोचा हा प्रवास आनंद देणारा होता. मेट्रो प्रवासानंतर मी रिक्षा पकडली आणि घरी परतले, असे त्यांनी म्हटलेय.