मुंबई : सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी शेतक-यांसाठी हेल्पलाईन सुरु केली आहे. पीक कर्जमाफीबाबत शेतक-यांच्या शंका निरसनासाठी हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात यावा अशी मागणी, झी 24 तासनं आपल्या रोखठोक या विशेष कार्यक्रमातून केली होती. त्यावर सकारात्मक विचार करत, सुभाष देशमुख यांनी ही हेल्पलाईन सुरु केली आहे. हा हेल्पलाईन क्रमांक 18002330244 असा आहे.
दरम्यान खरीप पिकासाठी आतापर्यंत 13 लाख 85 हजार शेतक-यांना एकूण 8 हजार 332 कोटी रुपयांचं कर्जवाटप झालं असल्याचं, सुभाष देशमुखांनी सांगितलंय. कर्जवाटपाचं हे प्रमाण 21 टक्के इतकं असल्याचं ते म्हणाले. तर ज्या जिल्हा बँका पैसे असूनही शेतक-यांना 10 हजार रुपये देणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.
पाहा व्हिडिओ