मुंबई पुन्हा डुबणार! पुढच्या ४८ तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

मान्सूनचा वेग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. केरळमधून आलेला पाऊस आता दक्षिण भारतामध्ये सक्रीय झाला आहे.

Updated: Jun 5, 2018, 04:50 PM IST
मुंबई पुन्हा डुबणार! पुढच्या ४८ तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज title=

मुंबई : मान्सूनचा वेग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. केरळमधून आलेला पाऊस आता दक्षिण भारतामध्ये सक्रीय झाला आहे. आता हाच मान्सून मध्य भारताकडे चालला आहे. पुढच्या ४८ तासांमध्ये मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईमध्ये मान्सून ८ जून ते १० जूनपर्यंत पोहोचतो. पण यावर्षी बुधवार रात्रीपासूनच पावसाला सुरुवात होऊ शकते. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं पुढचे ४८ तास मुंबईत जोरदार पाऊस होईल आणि जनजीवन विस्कळीत होईल, असा अंदाज दिला आहे. मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनवरही यामुळे परीणाम होऊ शकतो. बुधवारी रात्रीपर्यंत मुंबईत मान्सनू पोहोचेल आणि सोमवारपर्यंत पाऊस पडेल, असा स्कायमेटचा अंदाज आहे.

घरातून बाहेर पडू नका

मान्सून दाखल व्हायच्या आधीपासूनच मुंबईत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडणं टाळावं, असं आवाहन स्कायमेटनं केलं आहे. स्कायमेट आणि मोसम विभागानं यावर्षी सामान्य पाऊस पडेल असा अंदाज याआधीच वर्तवला होता.