'48 तासात मुंबई, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार'

राज्यातील पावसाच्या एकूण परिस्थितीवर कुलाबा वेधशाळेचे संचालक के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.

Updated: Aug 28, 2017, 07:30 PM IST
 '48 तासात मुंबई, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार' title=

मुंबई : येत्या 48 तासात मुंबई, उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात अती मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केली आहे.  मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. 

राज्यातील पावसाच्या एकूण परिस्थितीवर कुलाबा वेधशाळेचे संचालक के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.

आम्ही प्रत्येक ३ तासाला अपडेट महत्वाच्या संस्थांनाही देत असतो अशी माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. मुंबईसह उत्तर कोकण, तसेच उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.