मुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीलाही फटका

मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका हवाई वाहतुकीला देखील बसला आहे. नागपूरहून मंगळवारी रात्री निघालेली दोन ते तीन विमाने मुंबई विमानतळावर न उतरताच परत नागपुरात आली.

Updated: Sep 20, 2017, 01:05 PM IST
मुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीलाही फटका  title=

मुंबई : मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका हवाई वाहतुकीला देखील बसला आहे. नागपूरहून मंगळवारी रात्री निघालेली दोन ते तीन विमाने मुंबई विमानतळावर न उतरताच परत नागपुरात आली.

मुंबई विमानतळाच्या रनवेवर पाणी साचल्याने व व्हिजिबिलिटी कमी असल्याने विमानांना लँडिंग करता आले नाही. नागपूर विमानतळावर माघारी आलेल्या विमानाच्या प्रवाशांना योग्य सुविधा मिळत नसल्याने नागपूर विमानतळावर या प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.

मंगळवारी रात्री उशीर ही विमाने नागपुरात परत आल्याने अनेक प्रवाश्यांना रात्रभर नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर तातकळत राहावे लागले. यात झिम्बाब्वेच्या अंडर १९ क्रिकेट संघाचा देखील समावेश आहे. नागपूर विमानतळ प्रशासनकडून आवश्यक सुविधा न पुरविल्याचा आरोप अनेक प्रवाशांनी केला. बुधवारी दुपारपर्यंत मुंबईला थेट विमान नसल्याने तसेच मुंबईतील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतल्यावरच विमानसेवा सुरळीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.