मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस

परतीच्या पावसाने निरोप घेतल्यानंतर ऑक्टोबर हिटचा तडाखा मुंबईकरांना जाणवत असतानाच शुक्रवारी मुंबईत जोरदार वाऱ्यांसह पाऊस सुरु झाला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 6, 2017, 05:11 PM IST
मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस  title=

मुंबई : परतीच्या पावसाने निरोप घेतल्यानंतर ऑक्टोबर हिटचा तडाखा मुंबईकरांना जाणवत असतानाच शुक्रवारी मुंबईत जोरदार वाऱ्यांसह पाऊस सुरु झाला आहे.

दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील विविध भागांत अचानक काळोख पसरला. तसेच जोरदार वाऱ्यांसोबतच पावसाला सुरुवात झाली.

विजांचा कडकडाट, काळोख आणि पाऊस असं वातावरणं पहायला मिळत आहे. सायंकाळी शाळा, महाविद्यालय आणि कार्यालय सुटण्याच्या सुमारास अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली आहे.

कार्यालय सुटण्याची वेळ झाली आहे. पण, मुंबईकरांनो तुम्ही घाबरुन जाऊ नका आणि गोंधळ करु नका. कारण, रेल्वे व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे सुरुळीत सुरु आहे.