Gold Rate Today : दसऱ्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण

आजचा सोने - चांदीचा दर 

Updated: Oct 18, 2021, 01:54 PM IST
Gold Rate Today : दसऱ्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण title=

मुंबई : भारतीय सराफा बाजारात सोने - चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तांनी सोने-चांदीच्या दरात थोडी वाढ झाली होती. सणाच्या दिवशी सोन्यात गुंतवणूक करणं शुभ मानलं जातं. यानंतर मात्र आता सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 

भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. इंडिया बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी आज (सोमवार) म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या दरात 746 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आता सोन्याचा दर 47379 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीच्या दरात 734 रुपयांनी घसरण झाली आहे. आज चांदीचा दर 63186 रुपये प्रति किलो आहे. 

दसऱ्याच्या दिवशीही सोने-चांदीच्या दरात चढ उतार पाहायला मिळाला आहे. विजयादशमीच्या एक दिवस अगोदर सोन्याची किंमत 472 रुपये आणि चांदीच्या दरात 557 रुपये वाढ पाहायला मिळाली. शुक्रवारी दसऱ्याच्या सुट्टीच्या दिवशी सराफा बाजारात सोन्याचा दर जाहीर केले नाही. गुरूवारी सोने - चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली. 999 शुद्धता असलेला सोन्याचा दर 48125 रुपयांवर बंद झालं. तर चांदीचा दर 63290 रुपये प्रति किलो आहे. 

22 कॅरेट आणि 24 कॅरेटमध्ये अंतर 

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आणि 22 कॅरेट अंदाजे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त सारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने आलिशान असले तरी ते दागिन्यांचे बनू शकत नाही. म्हणूनच बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.