गुंतवणुकदारांच्या प्रिय 'सोन्याचे भाव वाढले'

सोन्याच्या भावात प्रति दहा ग्रॅम 85 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं 31 हजार 835 रुपयांवर पोहचलाय.

Jaywant Patil Updated: Mar 26, 2018, 05:53 PM IST
गुंतवणुकदारांच्या प्रिय 'सोन्याचे भाव वाढले' title=

मुंबई : सोन्याच्या भावात प्रति दहा ग्रॅम 85 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं 31 हजार 835 रुपयांवर पोहचलाय. जागतिक पातळीवर भावात आलेली तेजी आणि स्थानिक सराफांकडून वाढलेली खरेदी यामुळे सोन्याला झळाळी आली आहे. औद्योगिक क्षेत्र आणि नाणी तयार करणाऱ्यांकडून मागणी वाढल्याने चांदीचा भावही प्रतिकिलो 50 रुपयांनी वाढून तो 39 हजार 600 रुपयांवर पोहचला आहे. अमेरिका आणि चीनमध्ये युद्धाच्या भीतीने डॉलरमध्ये घसरण होतेय. 

सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक

डॉलरमध्ये घसरण होत असल्याने, सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे गुंतवणूकदारांचा रोख वळलाय. सोन्याकडे अनेक जण गुंतवणूक म्हणून पाहतात. तसेच भारतातही सोन्याच्या भाववाढीविषयी अनेकांना आकर्षण असल्याचं दिसून आलं आहे. अनेक दिवसानंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ दिसून आली आहे.