Domino's Pizzaमध्ये सापडले काचेचे तुकडे, फोटो व्हायरल झाल्यानंतर कंपनीने दिलं 'हे' उत्तर

डॉमिनोज पिझ्झा खाणाऱ्यांनो लक्ष द्या! 

Updated: Oct 10, 2022, 09:31 AM IST
Domino's Pizzaमध्ये सापडले काचेचे तुकडे, फोटो व्हायरल झाल्यानंतर कंपनीने दिलं 'हे' उत्तर title=

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai) सुप्रसिद्ध पिझ्झा (pizza) ब्रँड डॉमिनोजच्या (dominos) पिझ्झामध्ये काचेचे तुकडे (pieces of glass) असल्याचा दावा करण्यात आला आहे. अरुण नावाच्या व्यक्तीने त्याच्या ट्विटर (Twitter) अकाउंटवरून काच आढळलेल्या पिझ्झाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पिझ्झाच्या (pizza) आत काचेचे (glass) तुकडे दिसत आहेत. हा पिझ्झा त्याने डॉमिनोजकडून (dominos) ऑर्डर केल्याचे अरुण सांगतिले. पिझ्झा खात असताना त्यात काचेच्या काचेचे तुकडे सापडल्याचे अरुणने म्हटलं आहे. 

"डॉमिनोज पिझ्झामध्ये काचेचे 2-3 तुकडे आहेत. ही जागतिक खाद्य ब्रँडची स्थिती आहे. मला माहित नाही की मी भविष्यात डॉमिनोजकडून काही ऑर्डर करेन की नाही," असे अरुणने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

या ट्विटमध्ये अरुणने डॉमिनोजशिवाय मुंबई पोलिसांना (Mumbai Police) टॅग केले होते. मुंबई पोलिसांनी अरुणला आधी डॉमिनोजच्या (dominos) कस्टमर केअरसोबत बोलण्याचा सल्ला दिला. तेथूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करू शकतो, असे पोलिसांनी आपल्या उत्तरात म्हटलं आहे.

अरुणच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने त्याला विचारले की त्याच्या पिझ्झा (pizza) बॉक्ससोबत छेडछाड झाली आहे का? अरुणने सांगितले की पिझ्झा बॉक्स पूर्णपणे सील करण्यात आला होता. अरुणच्या म्हणण्यानुसार, त्याने हा पिझ्झा फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोवरुन (Zomato) ऑर्डर केला होता.

अरुणने हे सांगितल्यानंतर त्याला झोमॅटोच्यावतीने (Zomato) ट्विटरवर उत्तर देण्यात आले.  "असं घडायला नको होतं. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत आणि लवकरच तुम्हाला कळवू," असे झोमॅटोने म्हटलं आहे.

डॉमिनोजने दिलं उत्तर

डॉमिनोजच्या प्रतिनिधीने मनीकंट्रोलशी बोलताना सांगितले की, "ही बाब समोर येताच कंपनीने ग्राहकांशी संपर्क साधला होता. "आमच्या प्रतिनिधींनी  त्या रेस्टॉरंटची तपासणी सुरू केली आहे जिथून ग्राहकाने ऑर्डर दिली होती. तपासणीत काहीही आढळून आली नाही. स्वयंपाकघर आणि इतर कामाच्या ठिकाणी काच नसावी, असे आमचे कठोर धोरण आहे."

आम्ही आमच्या किचनमध्ये काच न वापरण्याच्या कठोर धोरणाचे पालन करतो आणि गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या सर्वोच्च मानकांचे पालन करतो. तक्रारदाराकडून नमुने घेतल्यानंतर आम्ही या प्रकरणाची अधिक चौकशी करू आणि त्यानुसार कारवाई करू, असे डॉमिनोजने सांगितले. या कथित घटनेने पिझ्झाप्रेमींमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.

दरम्यान, याआधीही डॉमिनोजच्या खाद्यपदार्थांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऑगस्ट महिन्यात एक फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. यामध्ये, डॉमिनोजच्या एका आउटलेटमध्ये टॉयलेटच्या साफसफाईच्या वस्तू पिझ्झाचे पीठ असलेल्या ट्रेच्या अगदी वर टांगल्या होत्या. हे चित्र समोर आल्यानंतर लोकांनी डॉमिनोजमधील स्वच्छतेच्या नियमांवर प्रश्न उपस्थित केले होते.