मरीन ड्राईव्हवर सेल्फी काढताना तरुणीनं गमावला जीव

समुद्रकिनाऱ्यावर निष्काळजीपणे सेल्फी काढताना एका तरुणीला आपल्या जीवाला मुकावं लागलंय.  

Updated: Jun 28, 2017, 12:15 PM IST
मरीन ड्राईव्हवर सेल्फी काढताना तरुणीनं गमावला जीव title=

मुंबई : समुद्रकिनाऱ्यावर निष्काळजीपणे सेल्फी काढताना एका तरुणीला आपल्या जीवाला मुकावं लागलंय.  

मरीन ड्राईव्ह येथे सेल्फी काढताना तोल जाऊन १७ वर्षीय प्रीती भिसे या तरुणीचा मृत्यू झालाय... मंगळवारी ही घटना घडली. मात्र, प्रितीचा मृतदेह सापडण्यासाठी आजचा दिवस उजाडला.

मंगळवारी दुपारी २.३० ते ३ वाजल्याच्या दरम्यान प्रीती तिच्या मित्रांसोबत मरिन ड्राईव्हर फिरायला गेली होती. कठड्यावर उभी असताना समुद्राच्या लाटांचा अंदाज न आल्याने ती वाहून गेली, अशी माहिती पुढे आलीय.