चेंबूरमध्ये भररस्त्यात गॅस गळती

चेंबूरमध्ये आज भर रस्त्यात गॅस गळती सुरू झाली. दुपारी साडे बाराच्या सुमाराला ही घटना घडली. गॅसगळती झाल्यानं परिसरात घबराट निर्माण झाली. 

Updated: Jul 31, 2017, 03:36 PM IST
चेंबूरमध्ये भररस्त्यात गॅस गळती title=

मुंबई : चेंबूरमध्ये आज भर रस्त्यात गॅस गळती सुरू झाली. दुपारी साडे बाराच्या सुमाराला ही घटना घडली. गॅसगळती झाल्यानं परिसरात घबराट निर्माण झाली. 

चेंबूर नाक्यावर असलेल्या सी एन जी फिलिंग स्टेशनला जाणाऱ्या वाहिनीतून ही गॅस गळती सुरु झाली होती. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीनं घटनास्थळी पोहोचल्या. आणि गॅस पाईपलाईनमधली गळती थांबवण्यात आली. 

दरम्यान या गॅसगळतीमुळे काही काळ पनवेल सायन महामार्ग बंद करण्यात आला होता. आता या मार्गावरची वाहतूक सुरळीत आहे.