Lalbaugcha Raja 2023 : अवघ्या काही दिवसांनी गणरायाचं आगमन होणार आहे. लाडक्या बाप्पाने सर्व बाप्पामय होणार आहे. मुंबईचा लाडका आणि भक्तांना पावणारा लालबागचा राजाचे प्रथम दर्शन (Lalbaugcha Raja 2023 First Look) आज घडणार आहे. लालबागचा राजाचं प्रथम दर्शन (प्रिंट आणि डिजिटल माध्यमांसाठी) शुक्रवार आज 15 सप्टेंबर 2023 संध्याकाळी 7.00 वाजता होणार आहे. तुमच्या लाडक्या बाप्पाचं देखरुप पाहण्यासाठी थेट प्रक्षेपण मंडळाच्या अधिकृत YouTube चॅनलवर पाहता येणार आहे. (Ganesh Chaturthi 2023 Lalbaugcha Raja First Look take a look of ganpati pandals journey till now watch video)
तुमचा आमचा लाडका लालबागचा राजाची कहाणी अतिशय रंजक आहे. यंदा बाप्पाचे 90 वर्ष असून या मंडळाची स्थापना अनेक वर्षांपूर्वी म्हणजे 1934 मध्ये मुंबईतील प्रसिद्ध असं लालबाग बाजारपेठेत झाली. काही मच्छीमार आणि व्यापाऱ्यांनी एकत्र येतं या मंडळाची स्थापना केली.
या बाप्पाला गेल्या 90 वर्षांपासून कांबळी ज्युनियर कुटुंब बनवतात. तुम्हाला गेल्या 90 वर्षांमध्ये बाप्पाचं देखरुप वर्षांनुवर्ष कसं बदलत गेले ते पाहायचं आहे का? (Lalbaugcha Raja 2023 video ) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील baroda_cha_raja_ganpati_maza या अकाऊंटवर निरंतर प्रवास लालबाग राजाचा दाखविण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान पसंत केला जातो आहे.
लालबागचा राजा हा फक्त मुंबईचा नाही तर अख्खा देशाचा आहे. या राजाचा दर्शनासाठी कानाकोपऱ्यातून भक्त येतात. राजकारणी असो किंवा सेलिब्रिटी राजाचा चरणी दरवर्षी नतमस्तक होताना दिसतात.
लालबागचा राजा हा मूळ नवसाने स्थापन करण्यात आला. कोळी आणि इतर व्यापारी बंधूनी नवस केला आणि हा राजा लालबागच्या मार्केटमध्ये आला. 90 वर्षांपासून तो दरवर्षी येतो आणि कोळी बांधवांना इथे अतिशय मान आहे.
त्या काळापासून गणरायाच्या मूर्तीस निरनिराळ्या नेत्यांची रुपं पाहिल्या मिळाली. 1946 मध्ये बाप्पा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेषात विराजमान झाले होते. काळारुप बाप्पा बदलत गेले.