समुद्रमार्गे बोटीने चार संशयित डहाणूत शिरले; पोलिसांकडून हाय अलर्ट जारी

पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरु 

Updated: Oct 8, 2018, 11:30 PM IST
समुद्रमार्गे बोटीने चार संशयित डहाणूत शिरले; पोलिसांकडून हाय अलर्ट जारी title=

मुंबई: डहाणूनजीकच्या समुद्रातून सोमवारी चार संशयित व्यक्तींनी घुसखोरी केल्याचे वृत्त आहे. एका लहान बोटीतून आलेले हे चार जण घोलवड परिसरात उतरले. या व्यक्ती संशयास्पद वाटल्याने स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर डहाणू आणि घोलवड परिसरात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. 

बोईसरमध्ये स्फोटकांचा साठा जप्त

बोईसरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला. नागझरी परिसरातील एका घरावर पोलिसांनी छापा मारला. यावेळी घरातील गोठ्यात जिलेटीनच्या ३५० कांड्या आढळून आल्या. अशा परिस्थितीत डहाणूत संशयितांचा वावर असल्याचे वृत्त आल्याने या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे.