महाराष्ट्रातला डाटाही खासगी संस्थेकडे लीक

 अमेरिकेत केंब्रिज अॅनालिटिक्सचं फेसबुक डाटाचोरी प्रकरण गाजत असताना, महाराष्ट्रातला डाटाही खासगी संस्थेकडे लीक होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. राज्य सरकारनं २०१६ साली महाराष्ट्र महामित्र नावाचं मोबाईल अॅप तयार केलं. 

Surendra Gangan Updated: Mar 27, 2018, 07:39 PM IST
महाराष्ट्रातला डाटाही खासगी संस्थेकडे लीक title=

मुंबई : अमेरिकेत केंब्रिज अॅनालिटिक्सचं फेसबुक डाटाचोरी प्रकरण गाजत असताना, महाराष्ट्रातला डाटाही खासगी संस्थेकडे लीक होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. राज्य सरकारने २०१६ साली महाराष्ट्र महामित्र नावाचे मोबाईल अॅप तयार केले. या अॅप्लिकेशनवरची सगळी माहीती अनुलोम या खासगी ट्रस्टकडे जाते, सरकारच्या माहिती विभागाकडे येत नाही, अशी टीका करण्यात येतेय.

अतुल आणि चंद्रशेखर वझे हे या संस्थेचे प्रमुख असून संस्थेचा सर्व्हर जर्मनीत आहे. या डाटाचा वापर राजकीय कारणासाठी होतो का, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.