Viral: फ्लाइंग वडापाव तुम्ही कधी पाहिला आहे का? Video पाहून बसेल आश्चर्याचा धक्का

Risks His Life : रेल्वे स्टेशन आणि रेल्वे प्लॅटफॉर्म (Platform), धावती ट्रेन (Train) पकडतानाचे अनेक धक्कादायक व्हिडीओ  (Shocking video) आपण पाहिले आहेत. रेल्वे अपघाताचे थरकाप उडवणार व्हिडीओ पाहून तर अंगावर काटा येतो. पण रेल्वे अपघाताचा थरार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Updated: Nov 13, 2022, 08:47 AM IST
Viral: फ्लाइंग वडापाव तुम्ही कधी पाहिला आहे का? Video पाहून बसेल आश्चर्याचा धक्का title=
Flying Vada Pav Trending video Viral On Social nmp

 

Flying Vada Pav Trending video : मुंबईची पहिली ओळख म्हणजे मुंबईची लाइफलाईन लोकल (Mumbai Local lifeline of Mumbaikars)...तर दुसरी ओळख म्हणजे वडापाव (Vada Pav)...स्ट्रीट फूडमध्ये सर्वात लोकप्रिय असा पदार्थ...कमी पैशात सर्वसामान्यांची भूक भागवणारा हा पदार्थ आता महाग झाला आहे. अशोक वैद्य ( Ashok Vaidya) या मराठी माणसाने मुंबईतील दादर रेल्वे स्ठानकाबाहेर (Dadar Railway Station in Mumbai) वडापाव विकण्यास सुरुवात केली. ..आणि आज बघाबघा हा वडापाव जगाच्या पातळीवर लोकांना त्याने भुरळ घातली. मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा हा वडापाव आज गल्लीबोळ्यात मिळतो. 

अनोख्या वडापाव

आम्हाला सांगा तुम्ही कधी उडणारा वडा पाव पाहिला आहे का?  मुंबईकरांचा शान म्हणजे वडापाव तो देखील उडणारा...ऐकून नवलं वाटलं ना...तुम्ही म्हणत असाल की उल्टा म्हणायचं आहे का? तर नाही उडताच जो हवेत उडतो तो. सोशल मीडियावर एका स्ट्रीट फूड विक्रेत्याचा(Mumbai street food) व्हिडीओ व्हायरल(video viral)  होतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरांनी आश्चर्य व्यक्त केला आहे. तुम्ही फ्लाइंग डोसा किंवा रजनीकांत डोसा ऐकला असेलच...अगदी तसंच हा फ्लाइंग वडापाव म्हणून प्रसिद्ध आहे. (Flying Vada Pav Trending video Viral On Social nmp )

हेही वाचा - Video Railways: रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक समोरुन धावत आला मृत्यू ...

कुठे मिळतो हा वडापाव? 

खवय्येगिरी करणाऱ्या प्रश्न पडला असेल कुठे मिळतो हा वडा पाव...तर आम्ही तुम्हाला सांगतो हा अनोख्या वडापाव मुंबईतील बोरा बाजार स्ट्रीटवर (Bora Bazar Street) हा वडापाव मिळतो. तब्बल 60 वर्षापासून रघू डोसा वाला (Raghu dosa wala) नावाचा खाद्यपदार्थांच्या स्टॉल आहे. मुंबईकरांचा जीव की प्राण हा उडणारा वडापाव अनेकांचा लक्ष वेधून घेतो. गरमागरम वडा, हिरवी आणि लाल कोरडी चटणी लावलेल्या पावात ठेवून त्याचा आस्वाद प्रत्येकाने घ्यावा असा आहे. 

नक्की भेट द्या!

व्हायरल झालेला हा व्हिडिओ आमची मुंबई नावाच्या एका फूड ब्लॉगरने यूट्यूबवर पोस्ट केला असून या व्हिडिओला आतापर्यंत 2,71,654 व्ह्यूज मिळाले आहेत. या रघु स्टॉलवर डोसा, इडली वडा, चीज, मसाला वडा पाव असे विविध स्नॅक्स सर्व्ह केले जातात. त्यामुळे जर तुम्ही कधी बोरा बाजार स्ट्रीट या बाजूला गेलात तर या स्टॉलला नक्की भेट द्या.