जोगेश्वरीतील भीषण आग आटोक्यात

जोगेश्वरी परिसरातील एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना आज गुरुवारी पहाटे घडली.  

Updated: Mar 5, 2020, 09:13 AM IST
जोगेश्वरीतील भीषण आग आटोक्यात title=
Pic Courtesy: ANI

मुंबई : जोगेश्वरी परिसरातील एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात गुरुवारी पहाटे यश आले आहेत. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. 

मुंबईतल्या जोगेश्वरी पश्चिमेतील सोमानी इंडस्ट्रीअल परिसरात भीषण आग लागली होती. मध्य रात्रीच्या सुमारास लग्नाच्या हॉलला आग लागली होती. ही आग सकाळपर्यंत धुमसत होती. दरम्यान अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्यानंतर युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरु झालेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.  

0