एवढं असणार मुंबईतल्या एसी लोकलचं तिकीट

मुंबईमध्ये पहिली एसी लोकल आज धावली आहे. 

Updated: Dec 25, 2017, 09:45 PM IST
एवढं असणार मुंबईतल्या एसी लोकलचं तिकीट title=

मुंबई : मुंबईमध्ये पहिली एसी लोकल आज धावली आहे. सकाळी साडे दहा वाजता बोरीवलीहून चर्चगेटला ही लोकल रवाना झाली. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.

उद्घाटनाच्या लोकलमध्ये मोजकेच सामान्य प्रवासी होते. पत्रकार आणि वृत्त वाहिन्यांच्या पत्रकारांसाठी एक वेगळा डबा देण्यात आला होता. सुटीचा दिवस असल्यानं स्टेशनवर फारशी गर्दी नव्हती. लोकलचे ऑटोमॅटिक दरवाजे, मोठ-मोठ्या खिडक्या आणि फुलांची सजावट सर्वांचं लक्ष वेधून घेत होती.

मुंबईमधल्या एसी लोकलचं तिकीट किती असणार ही उत्सुकता सगळ्यांनाच आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ६० रुपये, चर्चगेट ते दादर ८५ रुपये, चर्चगेट ते वांद्रे ८५ रुपये, चर्चगेट ते अंधेरी १२५ रुपये आणि चर्चगेट ते विरार २०५ रुपये असे या एसी तिकीटाचे दर असणार आहेत.