'मुंबई शहरामुळे झाला सुझान-हृतिक रोशनचा घटस्फोट, या शहरात लग्न...'; नातेवाईकाचा अजब दावा

Hrithik Roshan Sussanne Khan Divorce: हृतिक आणि सुझानने 2014 मध्ये घटस्फोट घेतला आहे. या दोघांच्या घटस्फोटाची त्यावेळी चांगलीच चर्चा झालेली. आता हा घटस्फोट पुन्हा चर्चेत आलाय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 19, 2024, 07:21 AM IST
'मुंबई शहरामुळे झाला सुझान-हृतिक रोशनचा घटस्फोट, या शहरात लग्न...'; नातेवाईकाचा अजब दावा title=
एका मुलाखतीमध्ये केलं हे विधान

Hrithik Roshan Sussanne Khan Divorce: अभिनेता जायद खानने त्याची बहीण सुझान खान आणि अभिनेता हृतिक रोशनच्या घटस्फोटासंदर्भात एक भलतेच तर्क लावले आहे. काही वर्षांपूर्वी हृतिक रोशन आणि सुझान खानने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण कुटुंब त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्या पाठीशी उभे राहिले असं जायद खानने म्हटलं आहे. मात्र या घटस्फोटाबद्दल बोलताना जायदने चक्क मुंबई शहरालाही दोष दिला आहे. त्याच्या या विधानाची सध्या चांगलीच चर्चा आहे. तो नेमकं काय म्हणालाय जाणून घेऊयात...

ऋतिक उत्तम व्यक्ती

हृतिक आणि सुझानने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमच्याकडे दोनच पर्याय शिल्लक होते. पहिला म्हणजे एकमेकांबद्दल मनात राग ठेऊन जगायचं किंवा आनंदाने जगत राहायतं. आम्ही सर्वांना दुसरा पर्याय निवडला असं जायद खान म्हणाला. हृतिक रोशनबरोबरच्या नात्यावरही जायद खानने भाष्य करताना, तो फारच चांगला व्यक्ती असल्याचं म्हटलं आहे. सध्या हृतिक आणि सुझान हे त्यांच्या नव्या जोडीदाराबरोबर दिसत असले तरी हे दोघे विभक्त होण्यासाठी मुंबई शहरही जबाबदार असल्याचं सुझानच्या भावाचं म्हणणं आहे.

ट्रोलर्सचा सामना करावा लागला का?

सुभोजित घोषच्या युट्यूब चॅनेलवर गप्पा मारताना जायद खानने ऋतिकबरोबरच्या नात्यावर भाष्य केलं आहे. हृतिक आणि सुझान विभक्त झाल्यानंतर ट्रोलर्सचा तुमच्या कुटुंबाला त्रास झाला का? असा प्रश्न जायद खानला विचारण्यात आला होता. "अशावेळी तुम्ही निगरगट्ट राहणं गरजेचं असतं. दुखाच्या वेळी तुमचं कुटुंब तुम्हाला कशी साथ देतं हे महत्त्वाचं असतं. आम्ही कुटुंब म्हणून फार खंबीर आहोत. आमच्यातील एखाद्याला काही झालं तर तो सगळ्यांसाठी चिंतेचा विषय असतो. यापेक्षा मी जास्त काही बोलू शकत नाही. या अशा गोष्टींकडे अधिक प्रगल्भतेनं पाहिलं पाहिजे. हे कोणासोबतही घडू शकतं," असं जायद खान म्हणाला. 

मुंबई घटस्फोटासाठी कशी जबाबदार?

यावेळेस जायद खानने लग्न टिकून राहण्यासाठी मुंबई शहरासारखी जागा फारच आव्हानात्मक शहर आहे, असं विचित्र विधानही केलं आहे.  "आपल्या शहराकडे पाहा. आपण अशा शहरांमध्ये राहतो जिथे विचलित होण्यासाठी एवढे सारे पर्याय आहेत. आपण डलहौसीमध्ये राहत नाही. या (मुंबईसारख्या) शहरात लग्न टिकून ठेवणं आव्हानात्मक आहे. लग्न टिकवून ठेवण्यासाठी हे शहर फार आव्हानात्मक ठिकाण आहे," असं जायद खान हृतिक आणि सुझानच्या घटस्फोटासाठी मुंबईही तितकीच जबाबदार असल्याचा दावा करताना म्हणाला. 

आजही दोघे एकमेकांच्या संपर्कात

घटस्फोटानंतरही हृतिक आणि सुझान एकमेकांच्या संपर्कात असून ते एकमेकांची काळजी करतात आणि त्यांनी एकमेकांच्या नव्या जोडीदारांना स्वीकारल्याचंही जायद खानने म्हटलं आहे. हृतिक आणि सुझानने 2014 मध्ये घटस्फोट घेतला. सध्या हे दोघेही ऋहान आणि ऋदान या दोघांच्या पालकत्वाची जबाबदारी संभाळतात.