मुंबई : बातमी आहे एका व्हायरल मेसेजची. दावा आहे अंडं हे शाकाहारीच आहे. पण, अंडं हे मांसाहारी की शाकाहारी याचं उत्तर अनेकांना माहित नाहीये. अंडं हे मांसाहारी आहे असं सगळेजण बोलतात. त्यामुळे आम्ही याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काय सत्य समोर आलं. (fact check of viral messege know egg veg or non veg)
दावा आहे अंडं हे शाकाहारीच आहे. अंडं देण्यासाठी नरासोबत कोंबडीचं मिलन होण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे अंडं हे मांसाहारी नसून, शाकाहारीच असल्याचा दावा केलाय. अंडं हे मांसाहारी की शाकाहारी यावरून अनेक दिवस वाद सुरू आहे.
संशोधकांच्या मते, आपण अंडी दररोज खातो, त्यामध्ये गर्भ नसतो. त्यामुळं पक्षी किंवा प्राण्यांची वाढ व्हावी, इतका जीवाचा विकास झालेला नसतो. ज्याप्रकारे गाईचं दूध शाकाहारी असतं त्याचप्रमाणे अंडंही शाकाहारीच असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र, आता अंडं हे शाकाहारी असल्याचा दावा केल्याने आम्ही या दाव्याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला.
आमचे प्रतिनिधी विशाल करोळे हे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना भेटले. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि याबाबत अधिक माहिती जाणून घेतली. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहुयात.
बाजारात मिळणारी बहुतांश अंडी लेयर फार्मवरून आणतात. लेअर फार्मवरून आणलेली अंडी शाकाहारी असतात. कारण अंडं देण्यासाठी नरासोबत मिलन होण्याची गरज नसते. कोंबडाविना कोंबडी अंडी देते ते अंडं शाकाहारी. त्यामुळेच गाईच्या दूधाप्रमाणे लेअर फार्मचं अंडंही शाकाहारी असल्याचा दावा
अंड्यामध्ये प्रोटीन असल्यानं ते आरोग्यासाठी उपयुक्त आहे. अंडं हे शाकाहारीच का? याची माहिती तज्ज्ञांनी दिलीय. त्यामुळे आमच्या पडताळणीत अंडं हे शाकाहारीच असल्याचा दावा सत्य ठरला.