घाटकोपर विमान दुर्घटनेचा EXCLUSIVE व्हिडिओ आला समोर

विमान दुर्घटनेचा आणखी एक व्हिडिओ आला समोर

Updated: Jun 29, 2018, 06:36 PM IST
घाटकोपर विमान दुर्घटनेचा EXCLUSIVE व्हिडिओ आला समोर title=

मुंबई : घाटकोपरमधल्या कालच्या विमान दुर्घटनेचा EXCLUSIVE व्हिडिओ झी २४ तासच्या हाती लागला आहे. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये अपघात झालेल्या सी-९० या विमानाचं जुहूमधून घेतलेलं उड्डाण हे अखेरचं ठरलं. जुहूमधून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान कोसळलं. पवनहंस विमानतळावर त्याचं लँडिंग होणार होतं. प्रशिक्षणाच्या निमित्तानं या विमानानं उड्डाण केलं गेलं होतं. या विमानाच्या उड्डाणाआधी विमानासमोर नारळ फोडण्यात आला, पेढे वाटण्यात आले. त्यानंतर या विमानानं उड्डाण केलं. आणि अवघ्या काही क्षणांतच हे विमान घाटकोपरमध्ये कोसळलं. सी ९० नावाचं हे विमान २३ वर्षे जुनं होतं.