मुंबई : सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल हे सांगता येत नाही. मात्र या व्हायरल होणाऱ्या गोष्टींमध्ये काही गोष्टी अशा असतात ज्या सत्य जगासमोर आणतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत 9 तास काम करणाऱ्या प्रत्येक माणसाची मनस्थिती आणि सद्यस्थिती मांडली आहे. 9 तास काम करण हा प्रत्येक ऑफिसचा नियम पण तरी देखील काही लोकं 9 तासापेक्षा जास्त तास ऑफिसमध्ये थांबून आपण किती कंपनीचा विचार करतो. हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा विचारांच्या कर्मचाऱ्यांची इथे पोलखोल केली आहे.
हा व्हिडिओ सध्या प्रत्येक सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर होत आहे. या व्हिडिओला खूप चांगली पसंती मिळत आहे. या व्हिडिओत 9 तास अगदी मन लावून काम करणाऱ्या व्यक्तीचं मत मांडल आहे. आपले 9 तास पूर्ण झाले की जो माणूस निघून जातो त्याच्याबद्दस सर्रास उलटी सुलटी चर्चा केली जाते. पण ही चर्चा जेव्हा चुकीच्या मोडला जाते. तेव्हा.... हेच या व्हिडिओत मांडल आहे.
हा व्हिडिओ सध्या खूप लोकप्रिय होत आहे. कामाचा खरेपणा मांडणारा हा व्हिडिओ आहे. अनेक ऑफिसमध्ये आपल्याला अशी परिस्थिती पाहायला मिळते.