एल्फिस्टनरोड दुर्घटना : प्रवासी आणि पत्रकारांनी डोंबिवलीत केले मूक आंदोलन

एल्फिस्टनरोड  येथे झालेल्या दुर्घटनेचा निषेध म्हणून आज डोंबिवलीत पत्रकार आणि नागरिकांनी मूक आंदोलन केले. या आंदोलनात  रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह कल्याण डोंबिवली पत्रकार संघाचे पत्रकारही सहभागी झाले होते. 

Updated: Oct 3, 2017, 06:01 PM IST
एल्फिस्टनरोड दुर्घटना : प्रवासी आणि पत्रकारांनी डोंबिवलीत केले मूक आंदोलन  title=

मुंबई : एल्फिस्टनरोड  येथे झालेल्या दुर्घटनेचा निषेध म्हणून आज डोंबिवलीत पत्रकार आणि नागरिकांनी मूक आंदोलन केले. या आंदोलनात  रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह कल्याण डोंबिवली पत्रकार संघाचे पत्रकारही सहभागी झाले होते. 

 पत्रकारांनी आणि प्रवाशांनी काळ्या फिती लावून रेल्वे प्रशासनाचा निषेध केला. कल्याण  आणि डोंबिवलीतून मुंबईला कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखांच्या घरात आहे. तसेच कल्याण डोंबिवली शहरांत राहणारे पत्रकारही मोठ्या संख्येने मुंबईला कामानिमित्त दररोज जात असतात त्यातून रेल्वेला कोट्यवधींचे उत्पन्न मिळत असले तरी रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सुखकर करण्याकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. 

 सुरक्षित प्रवास, स्वच्छता, स्वच्छता गृह, फेरीवाले, अत्यावश्यक सुविधा आदी महत्वाचे प्रश्न रेल्वेने तातडीने सोडवण्याची मागणी यावेळी करण्यात आली.