Eknath Shinde Dasara Melava : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आज आझाद मैदानावर पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. लाडकी बहीण योजना कशी आणली ते त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर स्पीड ब्रेकर लावणाऱ्या सरकारच ब्रेकर कसे उखडून टाकलं. याविषयी त्यांनी भाष्य केलं आहे.
तर लाडकी बहीण योजना आली नसती
लोकांच्या मदतीसाठी थेट रस्त्यांवर उतरणारा हा मुख्यमंत्री आहे. सत्तातर झालं नसतं तर लाखो कोटींचे प्रकल्प थांबले असते. उद्योग आले नसते. माझ्या लाडक्या बहिणींची योजना देखील आली नसती. माझ्या बहिणींना सन्मान मिळाला नसता. बहिणींना ताबोडतोब न्याय मिळाला नसता. शासन आपल्या दारी आलं नसतं. ज्येष्ठांना योजना मिळाली नसती. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र विरोधी विकास आघाडी सत्तेवर होती.
'जिथे नव्हता ब्रोकर तिथे टाकले स्पीड ब्रेकर'
दिसेल ते काम बंद पाडण्याचा सपाटा त्यांनी लावला होता. मेट्रो,बुलेट, कारशेड, जलयुक्त शिवार याला ब्रेक लावला. जिथे नव्हता ब्रोकर तिथे टाकले स्पीड ब्रेकर. असं यांचं काम होतं. आम्ही हे स्पीड ब्रेकर उखडून टाकलं. ज्या सरकारने स्पीड ब्रेकर टाकले ते सरकारच उखडून टाकलं. ज्या सरकारने स्पीड ब्रेकर टाकले त्या सरकारला आम्ही उखडून टाकलं. नवीन सरकार आणलं. माझी दाढी त्यांना खूपत आहे. ते सारखे दाढीवर बोलत आहे. म्हणून होती दाढी म्हणून तुमची उद्धवस्त केली महाविकास आघाडी. त्यानंतर विकासाची आघाडी जोरात वाहू लागली. ही दाढीची करामत आहे. म्हणून सांगतो मला हलक्यात घेऊ नका. असं एकनाथ शिंदे म्हणाले.
'धारावीमधील 2 लाख 10 हजार लोकांना घरे'
गेली 25 वर्षे मुंबईत तुमची सत्ता होती. पण तुम्हाला लोकांच्या विषयी काही नव्हते. धारावीकर असतील किंवा मुंबईचा विकास असेल हे सगळं मी आजपर्यंत मी पाहतो आहे. धारावी हा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. मात्र, त्यात देखील काही काड्या टाकणारे लोक आले. पहिल्या मुख्यमंत्र्यांनी तो प्रकल्प रद्द केला. पण का केला हे देखील जनतेला माहिती आहे. मात्र, मी त्यांना सांगितले की तिथे जेवढे लोक राहत आहेत त्या सर्वांना तुम्ही घरे द्या. 2 लाख 10 हजार लोकांना तुम्ही घरे द्या.