भाजपची सत्ता गेल्याने ते रडीचा डाव खेळत आहेत - एकनाथ शिंदे

महाराष्ट्र विकासआघाडीचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शिवाजी पार्कवर घेतलेली शपथ ही प्रोटोकॉलला धरून नसल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केला आहे.  

Updated: Nov 30, 2019, 02:05 PM IST
भाजपची सत्ता गेल्याने ते रडीचा डाव खेळत आहेत - एकनाथ शिंदे title=

मुंबई : महाराष्ट्र विकासआघाडीचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शिवाजी पार्कवर घेतलेली शपथ ही प्रोटोकॉलला धरून नसल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केला आहे. याला विकासआघाडीच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपची सत्ता गेल्याने आता त्यांना दुसरे काम नाही. केवळ कुरघोडी करण्यासाठी हे चालले आहे. भाजप आता रडीचा डाव खेळत आहे. भाजपने लोकसभेत काय केले ते सगळ्यांना माहित आहेत. आता हे आम्हाला शिकवत आहेत. त्यामुळे तुम्ही काय केले ते आधी पाहा, असा सल्लाही सत्ताधारी महाराष्ट्र विकासआघाडीच्या नेत्यांनी दिला आहे. त्याचवेळी भाजपकडून रडीचा डाव खेळाला जात असल्याची टीका शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

'भाजप रिकामा होईल, तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल'

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारविरोधात राज्यपालांकडे तक्रार दाखल करणार आहोत, असे सांगितले. या तक्रारीवर निर्णय न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा चंद्रकांत पाटल यांनी दिला आहे. तर अशी पद्धत भाजपनेच सुरू केली असून यावर कारवाई केली तर लोकसभा बरखास्त करावी लागेल असा टोला  राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे. तर भाजपची सत्ता गेल्यामुळे ते रडीचा डाव खेळत असल्याची टीका एकनाथ शिंदेंनी केलीय. 

आज उद्धव ठाकरे विश्वासदर्शक ठराव मांडणार असून याबाबत आता महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. हिंमत असेल तर गुप्त मतदान घ्या' असे आव्हान चंद्रकांत पाटलांनी महाविकासआघाडीला दिले असून खुल्या मतदानाला भाजपने विरोध दर्शवलाय तर भाजपच्या या आरोपाला प्रत्युत्तर देत खुलं मतदान नियमाला धरूनच असल्याचं नबाव मलिक यांचं म्हणणं आहे.  'अशा शपथविधीची प्रथा भाजपनंच सुरू केली असून 'आधी भाजपनं आमचं आव्हान स्वीकारावं' असं नवाब मलिकांनी म्हटले आहे. तर शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने आम्ही इथे आलोय त्यामुळे आम्हाला कोणाची भीती नाही, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीय अशी टीका एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

ठाकरे सरकारची आज अग्निपरीक्षा आहे. महाविकासआघाडीचं सरकार आज विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. त्यासाठी आजपासून दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय. आजच्या बहुमत चाचणीत महाविकासआघाडीला १७० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचं संजय राऊतांचा हवाला देत अजित पवारांनी सांगितलं. तर १६५ पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचं भुजबळांनी सांगितलं. याआधी हॉटेल ग्रँड हयातमध्ये महाविकासआघाडीच्या १६२आमदारांनी  जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. आता विधानसभेत आज खरंखूरं शक्तिप्रदर्शन होणार असून, सत्ताधारी आमदारांची संख्या १६२ पेक्षा वाढणार का, याकडं सगळ्यांचं लक्ष लागले आहे.