महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा

 एकनाथ शिंदे हे सध्या आमदारांसोबत सूरतच्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यामुळे त्यांची सूरतमध्ये जाऊन मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांनी भेट घेतली. 

Updated: Jun 21, 2022, 07:02 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा title=

Eknath Shinde Rebel: शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकवल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे हे सध्या या आमदारांसोबत सूरतच्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत.  त्यामुळे त्यांची सूरतमध्ये जाऊन शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा झाली.

 भेटीदरम्यान हिंदूत्व आणि इतर विषयांवरून एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. फोनवरून झालेल्या चर्चेदरम्यान परतण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेसमोर ठेवला. मात्र शिंदे यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधीमंडळ गटनेते पदावरून हटवल्याचं सांगत पद नाही, असंही शिंदे यांनी फोनवरून सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले आहेत. छगन भुजबळ हे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील दिल्लीतून मुंबईकडे रवाना झाले आहेत.