डीएसकेंच्या जामिनाच्या खटल्याला नाट्यमय वळण, निकाल उद्याच

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या संबंधी मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीस नाट्यमय वळण आलंय.

Updated: Feb 15, 2018, 07:57 PM IST
डीएसकेंच्या जामिनाच्या खटल्याला नाट्यमय वळण, निकाल उद्याच title=

मुंबई : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या संबंधी मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीस नाट्यमय वळण आलंय.

२२ फेब्रुवारीला डिएसके यांच्या प्रकरणी न्यायालय निकाल देणार असल्याचे मंगळवारी न्यायालयाने स्पष्ट केले होते. मात्र, आज काही नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर विशेष सुनावणी घेण्यात आली. यानंतर डीएसके प्रकरणाचा निकाल २२ फेब्रुवारीऐवजी १६ फेब्रुवारी म्हणजे उद्या ठेवण्यात आलीय.

नेमकं काय सुनावणी घेतली गेली? आणि २२ तारखेचा निकाल न्यायालय उद्या का देणार? याबाबत स्पष्टता देण्यात आली नाहीय.

मात्र, आता डीएसकेंचा फैसला २२ फेब्रुवारी ऐवजी उद्या केला जाणार आहे. त्यामुळे डीएसके यांचे नेमके काय होते? हे उद्या स्पष्ट होईल.