मुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून नाशिककडे निघालेल्या राज्यराणी एक्स्प्रेसवर एका अज्ञात समाजकंटकाने दगड भिरकावल्याची घटना काल रात्री साडेआठ वाजता घडली. वासिंद आणि आटगाव दरम्यान गाडीवर दगड फेकण्यात आला. या घटनेत इंजिनाची काच फुटून तिचा तुकडा इंजिन ड्रायव्हरच्या डोळ्यात घुसला.
ड्रायव्हरने गाडी वाटेत न थांबवता ती थेट कसारा इथे थांबवून त्याबाबत तक्रार दिली. या मार्गावर वारंवार होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. जखमी ड्रायव्हर व्ही. ई. चित्तारे यांच्यावर कसारा इथे प्रथमोपचार करून गाडी नाशिककडे रवाना करण्यात आली.