बारमध्ये लवकरच एमआरपीनुसार मिळणार दारू?

 दारू पिणाऱ्यांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारचा उत्पादन शुल्कात दहा टक्के वाढ करण्याचा विचार आहे.

Jaywant Patil Updated: Mar 19, 2018, 12:02 AM IST
बारमध्ये लवकरच एमआरपीनुसार मिळणार दारू?  title=

मुंबई : बारमध्ये लवकरच एमआरपीनुसार दारू मिळणार? असं म्हटलं जात आहे. सरकारचा निर्णय लवकरच आता बारमध्येही एमआरपीप्रमाणे दारू मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्त दर आकारून दारू विकणार्‍या बार मालकांना चांगला फटका बसण्याची शक्यता आहे. 

मात्र दारू पिणाऱ्यांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारचा उत्पादन शुल्कात दहा टक्के वाढ करण्याचा विचार आहे.

सर्व बारना एफएल-2 परवाना जारी

राज्य सरकार राज्यातील सर्व बारना एफएल-2 परवाना जारी करण्याच्या विचारात आहे. बारमध्ये एमआरपीच्या किंमतीनुसार आता लवकरच दारू मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यातील महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकारने प्राथमिक तयारी केल्याचं सांगण्यात येत आहे.

बार मालकांना एफएल-2 हा परवाना

बारमधून एमआरपीच्या दरात दारू मिळेल पण, ही दारू विकत घेतल्यानंतर त्यांना बारमध्ये बसता येणार नाही. कारण राज्य सरकारने बार मालकांना एफएल-2 हा परवाना दिला असेल. यानंतर ते वेगळ्या ठिकाणी मद्यपान करू शकतात, असे महसूल विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने म्हटलं आहे.