साहेबांचा आदेश आणि डोंबिवलीतून शिवसेना शहर शाखेकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

80 टन धान्याचा होणार वाटप डोंबिवलीतून 200 शिवसेनिक स्वता घरोघरी जाऊन वाटप करणार.

Updated: Jul 30, 2021, 08:23 PM IST
साहेबांचा आदेश आणि डोंबिवलीतून शिवसेना शहर शाखेकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात title=

आतिष भोईर, डोंबिवली : मागील आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीने हाहाकार उडाला. अनेक गावे पुराच्या पाण्याखाली गेली तर दरड कोसळून मोठी जीवितहानी झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि पूरग्रस्तांना मदतीचं आश्वासन दिलं. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतरांना ही मदत करण्याचं आवाहन केलं आणि शिवसैनिक साहेबांच्या आदेशानंतर कामाला लागले.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी डोंबिवली शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज जीवनावश्यक 29 वस्तूंचे किट, पाणी, कपडे आदी मदत घेऊन 18 गाड्या रवाना झाल्या. 

80 टन विविध प्रकारचे धान्याचा वाटप शिवसेना पदाधिकाऱ्यांसह 200 कार्यकर्ते पूरग्रस्त भागात घरोघरी जाऊन करणार साहित्यचे वाटप करणार आहॆ डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या हस्ते सर्व गाड्यांना भगवा झेंडा दाखवून गाड्या रवाना करण्यात आल्या.

राज्यातील विविध भागातून कोल्हापूर, महाड, सांगली या ठिकाणी मदतीचा ओघ सुरु आहे. विविध सामाजिक संघटना मदतीसाठी पुढे येत आहेत.