मुंबई : आशिया खंडातालील सर्वात मोठं थीम वॉटर पार्क, अशी ओळख असणाऱ्या एका ठिकाणाकडे तरुणाईसोबतच अनेकांचीच पावलं वळताना दिसतात. सेलिब्रिटी डीजे, आंतरराष्ट्रीय पातळीवरील राईड्स आणि अमर्याद कल्ला करण्याची संधी अशी घडी बसवून देणारी ही जागा म्हणजे वॉटर किंग्डम (Water Kingdom).
नुकतीच इथं Dj Angle नं हजेरी लावत तिच्या तावार सर्वांना थिरकायला भाग पाडलं होतं. तिनं तिथे ट्रॅक प्ले केला आणि इथे पाण्यात असणाऱ्यांनी जो काही कल्ला केला तो शब्दांतही मांडणं अशक्य.
वीकेंडसाठी सुट्टीला कुठे जायचं, हाच प्रश्न तुम्हीही आपल्या मित्रमंडळींना विचारत असाल, तर तुमच्यासाठी हे ठिकाण एक उत्तम पर्याय ठरू शकतं.
विचारही करता येणार नाही अशा अफलातून राईड्स आणि पाऊस येण्यापूर्वीच मनसोक्त भिजण्याची संधी देणारं असं हे ठिकाण अर्थात Water Kingdom तुमची वाट पाहतंय.
खिशाला परवडेल अशा दरांमध्ये तुम्ही इथं येण्याची व्यवस्था करु शकता. वाट कसली पाहताय? आताच https://www.waterkingdom.in/travel/ या संकेतस्थळावर भेट द्या आणि गाजवा तुमची सुट्टी.