दीपोत्सवाला आजपासून सुरूवात

अश्विन कृष्ण द्वादशी अर्थात गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस या सणापासून दिवाळीला खरी सुरुवात होते. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 16, 2017, 10:03 AM IST
दीपोत्सवाला आजपासून सुरूवात title=

मुंबई : लखलखत्या दीपोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. अश्विन कृष्ण द्वादशी अर्थात गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस या सणापासून दिवाळीला खरी सुरुवात होते. 

गाय आणि वासराच्या पूजेचे महत्त्व असलेला वसुबारस हा दिवाळीच्या दिवसांपैकी पहिला दिवस साजरा केला जातो. या दिवशी गायीची पाडसासह पूजा केली जात आहे. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.

ज्यांच्याकडे घरी गाय, वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी घरातील महिला गायीच्या पायावर पाणी घालतात. गायीला वस्त्र अर्पण करतात. शिंगे व खुरांना हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून, गायीचे व वासराचे औक्षण करून त्यांना नैवेद्य खाऊ घातला जातो. गोशाळांमार्फतही वसुबारस पूजेचे आयोजनही करण्यात येते.