दिशा पटनीने आदित्य ठाकरेंना अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. 

Updated: Jun 13, 2020, 04:47 PM IST
दिशा पटनीने आदित्य ठाकरेंना अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा title=

मुंबई : शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटनीनेही आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं एक ट्विट केलं आहे. 'वाढदिवसाच्या शुभेच्छा, असाच चमकत राहा,' असं ट्विट दिशाने केलं आहे. या ट्विटसोबतच दिशाने बदामाची इमोजीही जोडली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबतच आज दिशा पटनीचाही वाढदिवस आहे. 

दिशा पटनी आणि आदित्य ठाकरे यांच्या मैत्रीबद्दल नेहमीच सोशल मीडियावर चर्चा असते. अवधूत गुप्तेंसोबत झालेल्या एका प्रश्नोत्तराच्या रंजक सत्रामध्ये आदित्य ठाकरेंना लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तुमची दिशा चुकल्याचं उत्तर आदित्य ठाकरेंनी दिलं होतं. 

आदित्य ठाकरे आणि दिशा पटनी यांना जुहूच्या एका हॉटेलमध्ये डिनर डेटसाठी जातानाही पाहण्यात आलं. आदित्य आणि दिशा हे दोघं एकाच गाडीतून डिनर डेटसाठी येताना दिसले. मुख्य म्हणजे आदित्य ठाकरे स्वत: गाडी चालवत होते. आदित्य आणि दिशा यांच्या या 'डेट' विषयी चर्चांना उधाण आलं होतं. दिशा पटनीनेही या चर्चांना उत्तर दिलं होतं. 

'मित्रांसोबत लंच किंवा डिनरला जाऊ शकत नाही का? मित्रांची निवड करताना मी स्त्री-पुरुष भेदभाव करत नाही. मी ज्यांच्यासोबत असते ते माझे मित्र असतात. मी फक्त मैत्रिणींपुरती मर्यादित राहू शकत नाही. प्रत्येकाचे पुरुष मित्र आणि महिला मित्र असतात,' असं दिशा म्हणाली होती. 

कोरोना व्हायरसच्या संकटात आपला वाढदिवस साजरा करू नका, असं आवाहन आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांना केलं होतं. जिकडे असाल तिकडूनच मला शुभेच्छा द्या. हार-तुरे, केक आणि होर्डिंगवर खर्च करू नका, त्यापेक्षा या खर्चाने कोरोनाच्या संकटात सापडलेल्यांना मदत करा, किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसे द्या, असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं आहे.