मुंबई : गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाईच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आज शेवटच्या दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.
मुख्यमंत्र्यांनी सभागृहात चौकशीचं आश्वासन दिलं, पण अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
सरकार मुद्दाम भ्रष्टाचाराला पाठिशी घालत असल्याचा आरोप विखे पाटलांनी केला. तिकडे विधानपरिषदेतही याच मुद्दयावरून गोंधळ झाला. वारंवार स्थगन प्रस्ताव आणून त्याच त्या मागण्या करण्याची आता लाज वाटते, असा उद्विग्न शेरा विरोधी पक्ष नेते धनजंय मुडे यांनी मारला.