ख्रिसमस थीमवर इव्हेंट प्रमोट, अमृता फडणवीस सोशल मीडियावर ट्रोल

एका चॅरिटेबल इव्हेंटला प्रमोट करताना अमृता यांनी ख्रिसमस थीमचा वापर केला.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 13, 2017, 09:57 AM IST
ख्रिसमस थीमवर इव्हेंट प्रमोट, अमृता फडणवीस सोशल मीडियावर ट्रोल title=

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर सध्या भलत्याच चर्चेचा विषय ठरल्या आहेत. एका चॅरिटेबल इव्हेंटला प्रमोट करताना अमृता यांनी ख्रिसमस थीमचा वापर केला. त्यामुळे नेटीझन्सनी त्यांच्यावर प्रतिक्रीयांचा पाऊस पाडला. परिणामी त्या सोशल मीडियात ट्रोल झाल्या.

काय आहे प्रकरण?

अमृता फडणवीस या एका एफएम रेडिओ चॅनलवर एका चॅरिटेबल इव्हेंटमध्ये मंगळवारी सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाची थीम ख्रिसमसवर आधारीत होती. त्यामुळे अनेक नेटीझन्सना हा प्रकार आवडला नाही. त्यांनी अमृता यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली.

अमृता फडणवीस लग्नापूर्वी हिंदू होत्या?

ट्विटरवर अमृता फडणविस यांच्याबाबाबत अनेक प्रतिक्रीया पहायला मिळाल्या. यात एका यूजरने लिहिले की, 'अमृता फडणवीस या लग्नापूर्वी हिंदू होत्या?' तर, दुसऱ्या यूजरने म्हटले आहे की, 'अमृता फडणवीस यांनी हिंदू सण, उत्सवांनाही प्रमोट करायला हवे.'

प्रेम, सहानुभूतीसाठी कोणताही धर्म नसतो

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी चॅरिटेबल इव्हेंटचे फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केले  आहेत. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना टॅग करून लिहिले आहे की, 'प्रेम, शेअरींग आणि सहानुभूतीचा कोणताही धर्म असत नाही. आमच्या आजुबाजूच्या सकारात्मकतेला आपण स्विकारले पाहिजे. तर, नकारात्मकतेपासून दूर रहायला हवे.' अमृता फडणवीस यांचे ट्विट पाहताच यूजर्सनी त्यांना जोरदार ट्रोल केले.

अनेकांना ट्रोलिंगचा फटका

दरम्यान, हे पहिल्यांदाच घडत नाही. यापूर्वीही भाजपसह अनेक राजकीय पक्षांचे नेते, मंत्री, खेळाडू, सेलिब्रेटी, लोकप्रिय व्यक्ती ट्रोलची शिखार बनल्या आहेत. काही दिवसांपूर्वी महिला आणि बालविकास मंत्री आणि तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेही सेल्फीमुळे ट्रोल झाल्या होत्या.