Arnab Goswami : अर्णब गोस्वामींना अटक करताच अमृता फडणवीसांची अशी प्रतिक्रिया

पाहा त्या म्हणाल्या तरी काय? 

Updated: Nov 4, 2020, 03:10 PM IST
Arnab Goswami : अर्णब गोस्वामींना अटक करताच अमृता फडणवीसांची अशी प्रतिक्रिया  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : रिपब्लिक वाहिनीचे संपादक Arnab Goswami अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळातून आता याचे थेट पडसाद उमटताना दिसत आहेत. फक्त राजकीय वर्तुळातच नव्हे, तर सोशल मीडियावर विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी सदर प्रकरणात आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचाही समावेश आहे.

एकिकडे देवेंद्र फडणवीस यांनी गोस्वामी अटक प्रकरणी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला असतानाच दुसरीकडे त्यांच्या पत्नीनंही शायराना अंदाजात यासंदर्भात ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. 

'बहुत छाले है उसके पाओं में,
कम्बख़्त उसूलों पे चला होगा !', असं ट्विट त्यांनी करत अर्णब गोस्वामी यांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं. या ट्विचमध्ये त्यांनी काही हॅशटॅगही वापरले आहेत. ज्यामध्ये  #maharashtragovt #DeathOfDemocracy हे हॅशटॅग अनेकांचं लक्ष वेधत आहेत. 

सध्या अर्णब गोस्वामी प्रकरणाला चांगलीच हवा मिळत असल्याचं चित्र राजकीय वर्तुळात दिसत मुख्य म्हणजे या प्रकरणात महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला जात असल्याचं स्पष्ट होत आहे. 

 

नेमकी अटक का? 

अन्वय नाईक यांनी रिपब्लिकन वाहिनीसाठीच्या स्टुडिओचं काम केलं होतं. स्टुडीओच्या इंटेरियर डिझाईनच्या कामाची जबबाबदारी त्यांच्यावर होती. यासाठी 5 कोटी 40 लाख इतकं बिल अर्णब गोस्वामी यांच्याकडून येणं होतं. पण, वारंवार बिल मागूनही गोस्वामींकडून बिलाची रक्कम दिली गेली नाही. त्यामुळं मानसिक तणावाखाली अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी नाईक यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येस अर्णब याला जबाबदार धरलं होतं. तसेच त्यांच्या आईने देखील आत्महत्या केली आहे.  या घटनेसंदर्भात अन्वय नाईक यांच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून रायगड पोलिसांकडून कलम 306 अन्वये गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.