मुंबई : विधिमंडळ कामकाजाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला. फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीवर आक्षेप घेतला. तर मुख्यमंत्री ठाकरेंनीही त्याला सडेतोड उत्तर दिलं. उद्धव ठाकरेंचा शपथविधी घटनाबाह्य असल्याचा आरोप फडणवीसांनी केलं. तर त्याला उद्धव ठाकरेंनी ही सडेतोड उत्तर दिलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शपथ घेताना छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंच्या घेतलेल्या नावाला विरोधकांनी आक्षेप घेतला. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी घेतलेली शपथ विहीत नमुन्यातली नसल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला. शपथच कायदेशीर नसल्यानं त्यांचा परिचयही बेकायदा असल्याचा आरोप फडणवीसांनी केला.
भाजपच्या या आक्षेपावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिलं. महापुरूषांचं नाव घेतल्यावर इंगळी का डसली असा सवाल उद्धव ठाकरेंनी विरोधकांना विचारला.
कामकाजाच्या पहिल्या दिवशी ठाकरे विरुद्ध फडणवीस असा सामना पाहायला मिळाला. येत्या काळात हा सामना अधिक तीव्र होईल याचा ट्रेलर पाहायला मिळाला.