रमजाननिमित्त मोहम्मद अली रोडवर खवय्यांची गर्दी

 रमजान महिना आला की मुंबईतील एका रस्त्यावर दिवस रात्र रेलचेल सुरू असते.  

Updated: Jun 17, 2017, 06:10 PM IST
रमजाननिमित्त मोहम्मद अली रोडवर खवय्यांची गर्दी  title=

मुंबई :  रमजान महिना आला की मुंबईतील एका रस्त्यावर दिवस रात्र रेलचेल सुरू असते.  

मुस्लिम धर्मियांचा पवित्र महिना असलेल्या रमजानसाठी मुस्लिम बांधव रोजा ठेवतात. 

रोजा सोडण्यासाठी मोहम्मद अली रोडवर खूप सारे पक्वान्नांची दुकाने महिनाभर थाटली जातात. 

यंदा २६ जून रोजी रमजान ईद आहे. तोपर्यंत मोहम्मद अली रस्त्यावर मुस्लिमांसह सर्व धर्मिय खवय्येगिरी करण्यासाठी हजर असतात. 

 

यावेळी स्ट्रीट फूड स्टॉल, मोठे मोठी हॉटेल्स खवय्यांनी हाऊसफूल भरलेली असतात.  यात खाद्य पदार्थांमध्ये नल्ली निहारी, सिक कबाब, सल्ली कबाब, पाया सूप, माल पोहा, फिरनी,  चिकन कटलेट अशा अनेक खाद्यपदार्थांचा समावेश असतो.