मुंबई: मानखूर्द येथील मंडला झोपडपट्टीला अग्नितांडवाचा विळखा

मुंबईतील मानखूर्द येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांसाठी रविवारची पहाट ही अत्यंत दूर्दैवी ठरली. सकाळी सहाच्या सुमारास या परिसराला आग लागली. पाहता पाहता आगीच्या ज्वाळा वाढत गेल्या आणि त्यांनी संपूर्ण परिसर कवेत घेतला.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 11, 2018, 08:12 AM IST
मुंबई: मानखूर्द येथील मंडला झोपडपट्टीला अग्नितांडवाचा विळखा title=

मुंबई : मुंबईतील मानखूर्द येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांसाठी रविवारची पहाट ही अत्यंत दूर्दैवी ठरली. सकाळी सहाच्या सुमारास या परिसराला आग लागली. पाहता पाहता आगीच्या ज्वाळा वाढत गेल्या आणि त्यांनी संपूर्ण परिसर कवेत घेतला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अद्याप पुढे आले नाही. पण, वेळ पहाटेची असल्याने या आगीत मोठे नुकसान झाले असण्याची व अनेक जण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. त्यामुळे पहाटे कामावर जाणारा कामगार वर्ग आणि त्यांच्या डब्यासाठी भल्या पहाटे उठणाऱ्या महिलाही काहीशा उशीरपर्यंत विश्रांती घेतात. या परिसरातील शाळेत जाणारी कच्ची-बच्चीही काहीशी साखर झोपेचा अस्वाद घेतात. मात्र, रविवाही पहाटे लागलेल्या आगीने सर्वच विचका केला. लोकांच्या सुखाची जागा भय, आक्रोश, किंचाळ्या आणि सैरावैरा धावण्याने घेतली.