मुंबईतली अनेक पथकं यंदा ९ थरांची हंडी लावणार

राज्य सरकारकडून अजूनही दहीहंडीच्या थरांच्या मर्यादेबाबतचा अध्यादेश आलेला नाही. 

Updated: Aug 14, 2017, 04:11 PM IST
मुंबईतली अनेक पथकं यंदा ९ थरांची हंडी लावणार title=

मुंबई : न्यायालयाचे निर्बंध उठल्यानंतर, राज्य सरकारकडून अजूनही दहीहंडीच्या थरांच्या मर्यादेबाबतचा अध्यादेश आलेला नाही. त्यामुळे आता दहीहंडी पथकं सरसावली आहेत. मुंबईतली अनेक पथकं यंदा ९ थरांची हंडी लावणार आहेत. त्यामुळे ९ थरांच्या दहीहंडीचा विश्वविक्रम मोडण्याचा प्रयत्न यंदा केला जाणार का याबाबत उत्सुकता आहे. 

ठाणे शहर मनसेनं भगवती मैदानावर यंदाही 11 लाखाच्या दहीहंडीचे आयोजन केलं आहे. त्यामुळे आपल्याकडे 10 थर लागतील असा दावा ठाणे शहर मनसेनं केलाय. मुंबईतल्या जोगेश्वरीच्या जयजवान गोविंदा पथकाच्या नावावर 9 थरांचा विश्वविक्रम आहे. 

तर नऊ थरांसाठी प्रसिद्ध असलेल्या बोरिवलीचे शिवशाही, माझगाव ताडवाडी, ठाण्याचे गौरीशंकर गोविंदा पथकांच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे. मात्र शांतता क्षेत्र, गोविंदांच्या सुरक्षेच्या उपाययोजना आणि सरकारच्या आर्थिक व्यवहारांबाबतच्या कडक अटी यामुळे यंदा अनेक आयोजकांनी माघार घेतली आहे.