Cyrus Mistry ज्या मर्सिडीज कारमध्ये होते, काय आहे त्याची किंमत, सिक्युरिटी फिचर्स? जाणून घ्या

लाखोंच्या कारनं दिला दगा, अपघातानंतर चर्चेत Mercedes Benzचं हे मॉडेल ....

Updated: Sep 5, 2022, 03:15 PM IST
Cyrus Mistry ज्या मर्सिडीज कारमध्ये होते, काय आहे त्याची किंमत, सिक्युरिटी फिचर्स? जाणून घ्या title=

Cyrus Mistry Accident: टाटा समूहाचे माजी चेअरमन (Chairman) सायरस मिस्त्री (Cyrus Mistri) यांचं रविवारी अपघाती निधन झालं. मुंबईनजीक असणाऱ्या पालघर इथं असणाऱ्या सूर्या नदीच्या पुलावर असणाऱ्या डिवायडरला त्यांच्या कारनं धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला. (Cyrus Mistry Car Crash Death)

सायरस मिस्त्री ज्या कारने प्रवास करत होते त्या मर्सिडीज बेंझ (mercedes benz) कार मुंबईच्या प्रख्यात स्त्रीरोग विशेषज्ञ अनाहिता पंडोले (55) चालवत होत्या. या कारमध्ये चार जण बसले होते. प्रचंड वेग आणि कार चालवत असताना योग्य वळी योग्य निर्णय न घेतला गेल्यामुळं हा भीषण अपघात झाला.

प्रचंड वेगात असलेली कार डिव्हायडरला (Road Divider) आदळली, त्यामुळे अपघात झाला. सायरस मिस्त्री आणि जहांगीर दिनशा पंडोले यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनाहिता आणि सायरस यांचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर कारमधील चारही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, यात सायरस मिस्त्री आणइ जहांगीर पंडोले यांना मृत घोषित करण्यात आलं.

सायरस मिस्त्री यांची कार कोणती होती?
सायरस मिस्त्री जा कारमध्ये होते त्या कारचा नंबर MH-47-AB-6705 असल्याचं समोर आलं आहे. ही कार मर्सिडीज बेंझ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असून त्याचा मॉडेल नंबर  GLC 220 D 4MATIC असा आहे. ही कार 4 वर्ष जूनी आहे. डीझेल इंजीन असलेल्या या कारचं रजिस्ट्रेशन 21 मे 2018 रोजी करण्यात आलं होतं. या गाडीचं इंश्युरन्स, पीयूसी आणि इतर सर्व महत्त्वाची कागदपत्र योग्य होती.

किती आहे त्या कारची किंमत?
मर्सिडीज बेंझ GLC 220 D 4MATIC मॉडेल एक हायफाय कार आहे. ज्याची शोरुम किंमत जवळपास 68 लाख इतकी आहे. BS6 मॉडेलची ही कार डीझेल इंजिनवर चालते. या कारचा एका लीटरमध्ये 17 किलोमीटर अॅव्हरेज आहे. कंपनीने वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या कारमध्ये 4 सिलिंडरचं 1950 सीसीचं इंजिन आहे. प्रति सिलेंडर 4 इंधन पुरवठा आणि 4 वाल्व असलेले इंजिन खूप शक्तिशाली मानलं जातं. ही कार डायनॅमिक फ्रंट-रिअर सस्पेंशन आणि पॉवर स्टीयरिंगसह येते. समोर आणि मागील दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक बसवले आहेत.

5 सीटर असलेली ही कार खूपच आरामदायी आहे. फ्रंटरीअर पॉवर विंडोज, एअर कंडिशन, अॅडजस्टेबल हीटर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, एअर क्वालिटी कंट्रोल, रिमोट इंजिन स्टार्ट/स्टॉपलो फ्युएल वॉर्निंग लाइट अशा सुविधा या कारमध्ये आहेत.

सिक्युरिटी फीचर्स (Mercedes Benz Security Futures)
कारच्या सुरक्षेबाबत बोलायचं झाल्यास या गाडीत 7 एअरबॅग आहेत. ज्यात ड्रायव्हर आणि पॅसेंजर एअरबॅगसह Knee एअरबॅग्जचाही समावेश आहे. इतर वैशिष्ट्यांमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ब्रेक असिस्ट, सेंट्रल लॉकिंग, पॉवर डोअर लॉक, चाइल्ड सेफ्टी लॉक, अँटी थेफ्ट अलार्म इ. सुविधा आहेत. 

अपघाताच्या चौकशीचे आदेश
अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून निष्काळजीपणा हे अपघाताचं प्रमुख कारण असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण तपासानंतर नेमकं कारण समोर येईल. सायरस मिस्त्री आपला ड्रायव्हर आणि इतर दोन जणांबरोबर अहमदाबादहून मुंबईकडे येत होते. रविवारी दुपारी तीन वाजता पालघर जवळच्या सूर्या नदीवरच्या पूलावर त्यांची कार डिव्हायडरला आदळली.  यात सायरस मिस्त्री यांचं निधन झालं.