Weather | शेतकऱ्यांवर पुन्हा संकट, तर उकाड्यापासून हैराण झालेल्यांना दिलासा

weather in maharashtra |  बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील काही भागात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. 

Updated: Mar 21, 2022, 07:52 AM IST
Weather | शेतकऱ्यांवर पुन्हा संकट, तर उकाड्यापासून हैराण झालेल्यांना दिलासा title=

मुंबई : बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील काही भागात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईसह कोकणात ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी हलका पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. 

पावसामुळे पुढील 2 दिवसांत तापमान 2 ते 3 अंशांनी खाली येण्याचे संकेत दिल्याने उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळू शकतो. पण, या चक्रीवादळाचा राज्यावर फारसा परिणाम होणार नाही. 

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात उष्णतेमुळे नागरीक हैराण होते. विदर्भ, खानदेश, मराठवाड्यात उष्णतेचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला होता. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांनाही तोंड द्यावं लागत होतं. मुंबई, ठाण्यातही उष्णता वाढल्याने नागरिक घामाघूम होत आहेत.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला त्यानंतर मुंबईसह, कोकणात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. आजपासून २ दिवसात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतू पावसाच्या शक्यतेने बळीराजाचं टेन्शन वाढलं आहे. अवकाळी पावसामुळे हाती आलेल्या पिकांना फटका बसू शकतो.

पावसाच्या शक्यतेने राज्यातील उष्णतेत घट होणार आहे. त्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळणार आहे.