मुंबई : म्हाड़ाच्या मुंबईतील घरांच्या किंमतींचं पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. २०१७मध्ये निघालेल्या म्हाडाच्या लोअर परळ भागातील घरांच्या लॉटरीत ३६ पैकी २९ जणांनी मिळालेली घरं परवडत नसल्याचं कारण देऊन परत केली.
उच्च उत्पन्न गटासाठीच्या या ३६ घरांची किंमत १ कोटी ९६ लाखांघरात होती. ही किंमत परवड नसल्यानं ८० टक्के लोकांनी घरं परत केली. म्हणूनच आता म्हाडा व्यवस्थापनानं घरांच्या दरांचं पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतलाय.