भाजपवर टीका, पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात - संजय राऊत

Sanjay Raut on BJP : शिवसेना आणि भाजपमध्ये (Shiv Sena vs BJP) आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. मात्र, शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केल्यानंतर घुमजाव केले आहे.  

Updated: Jan 25, 2022, 11:05 AM IST
भाजपवर टीका, पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात - संजय राऊत title=
संग्रहित छाया

मुंबई : Sanjay Raut on BJP : शिवसेना आणि भाजपमध्ये (Shiv Sena vs BJP) आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. मात्र, शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केल्यानंतर घुमजाव केले आहे. मी कुणावर टिका केलेली नाही असे सांगत विलेपार्लेत विधानसभेत निवडणूक  झाली. शिवसेना प्रमख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी ओपन प्रचार केला, त्या निवडनुकीत कांग्रेस, भाजप दोघेही होते, आम्ही जिंकलो. सगळ्यांना झटका बसला, याची आठवण करुन दिली. त्याचवेळी आता पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक व्हायला पाहिजे, असे ते म्हणाले.

मतदार संभ्रमात आहे. आपण दिलेलं मत नेमकं त्याच पक्षाला अर्थात उमेदवाराला जात आहे का, याबद्दल भीती आणि संशय आहे. हा संशय दूर व्हायला पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक व्हायला पाहिजे, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी यावेळी केली. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे गोव्यात प्रचाराला येणार आहेत. कोविड नियमांचं पालन करुन गोव्यात प्रचार ( Goa assembly polls) करणार आहेत, अशी माहिती यावेळी राऊत यांनी दिली.

भाजपला काढला चिमटा

हिंदूत्व वाढेल, निवडणूक या मुद्दांवर जिंकू शकतो. आम्ही एकत्र निवडणुक लढू शकतो, असा प्रस्ताव आला. प्रमोद महाजन होते, अटल बिहारी वाजपेयी होते. नवहिंदूत्ववादी जे भाजपचे नेते आहेत, त्यांना सध्या माहिती नाही, असा चिमटा भाजपच्या नव्या नेत्यांना संजय राऊत यांनी काढला.

बाळासाहेब थोरात जे बोलले ते योग्य आहे. भाजपला रोखायचं असेल तर एकत्र निवडणुका लढवाव्या लागतील. दिल्ली काबिज करणं म्हणजे भाजपला रोखणं आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

पुनम महाजन यांना टोला

दरम्यान, व्यक्तीगत भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यावर वैयक्तिक टीका केलेली नाही. ते कार्टून आर के लक्ष्मण यांनी काढले आहे, असे प्रत्युत्तर राऊत यांनी  भाजपला दिले आहे. भाजप नेत्या पुनम महाजन सध्या कुठे आहेत, हे मला नाहीत नाही. पुनम महाजन यांना अस्वस्थ होण्याची गरज नाही, अजूनही ते कार्टून स्मरणात आहे, असे संजय राऊत यांनी पुनम महाजने यांच्या टीकेला उत्तर दिले. दिवंगत मनोहर पर्रिकर, महाजन यांच्या कुटुंबीयांशी भाजपचे नातं घनिष्ठ आहे, असे ते म्हणाले.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x