महाराष्ट्रात कोरोनाबाधितांनी ओलांडला १० लाखांचा टप्पा; दिवसभरात २४ हजाराहून अधिक नवे रुग्ण

गेल्या 24 तासात राज्यात 14 हजार 308 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

Updated: Sep 11, 2020, 09:12 PM IST
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांनी ओलांडला १० लाखांचा टप्पा; दिवसभरात २४ हजाराहून अधिक नवे रुग्ण title=
संग्रहित फोटो

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांनी तब्बल 10 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारी राज्यात एका दिवसात 24 हजार 886 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. तर दिवसभरात 393 जणांचा मृत्यू झाला आहे. 

गेल्या 24 तासात राज्यात 14 हजार 308 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 7 लाख 15 हजार 23 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण-रिकव्हरी रेट 70.4 टक्के इतका आहे.

महाराष्ट्रात पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2,23,710 इतकी झाली आहे. त्यापैकी 1,46,182 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून 4693 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 72,835 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 1,65,306 वर पोहचला असून 8067 जण दगावले आहेत. मुंबईत 1,29,244 जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या 27,642 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 लाख 15 हजार 681 इतका झाला आहे. सध्या राज्यात 2 लाख 71 हजार 566 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यात 28 हाजर 724 जण कोरोनामुळे दगावले असून राज्याचा सध्याचा मृत्यूदर 2.83 टक्के इतका आहे.