जितेंद्र आव्हाडांच्या १३ कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या १३ कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Updated: Apr 14, 2020, 10:47 PM IST
जितेंद्र आव्हाडांच्या १३ कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण title=

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या १३ कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आव्हाडांच्या या १३ कार्यकर्त्यांसोबतच एका माजी नगरसेवकालाही कोरोना झाला आहे. यासोबतच ठाण्यात एक पीएसआय आणि २ कॉन्स्टेबल अशा एकूण ३ पोलिसांची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. मुंब्रा पोलीस स्टेशनमधल्या एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली, या अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे इतरांनाही कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःची कोरोनाबाबत तपासणी केली असून रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी खबरदारी म्हणून स्वत:ला १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करून घेतलं आहे.

आजच्या एका दिवसात ठाणे शहरात कोरोनाचे २८ रुग्ण वाढले. ठाणे शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या ७४वर गेली आहे. 

मुंब्रा पोलीस स्टेशनमधील अधिकारी नाशिकमध्ये गेल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे त्याच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरु आहेत. त्यामुळे मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये या अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या ३३ पोलिसांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यांचे सँम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.